Saturday, May 17, 2014

कौल..घटना आणि प्रसंग यात काय फरक आहे?

घटना घडून जाते आणि प्रसंग लक्षात राहतो, त्यात एक अनुभव असतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो गूंतवून ठेवतो

आमच्या डाँक्टरला म्हणजे विनायकला म्हणजे डाँ. विनायक पाटकरला काल परवा असाच एक अनुभव आला...

नाँर्मल या शब्दाचा अर्थ आपण सामान्य असा घेतो आणि सामान्य म्हणजे मला नेहमी चार चौघांसारखे असा वाटतो आणि तो काही प्रमाणात खराही आहे...

आपण सगळे गर्दीत मिसळून जायचा प्रयत्न करतो. चार चौघांसारखे वागायचा प्रयत्न करतो तरी डाँक्टर सारखी माणसं वेगळी उठून दिसतातच
परवा आमचा डाँक्टर नेहमीप्रमाणे दवाखान्यात जायला निघाला सकाळची वेळ तशी घाईची वेळ प्रत्येकाला कुठे ना कुठे वेळेत पोहोचायचं असतं अशावेळी हाय हँलो करायचाही मूड नसतो किंवा तयारी नसते
त्यात नातेवाईक दिसले तर भले भले कल्टी मारताना मी पाहिले आहेत पटकन रस्ताच बदलतील, पानपट्टीचा आडोसा घेतील, चालायचा वेग कमी करतील, तंद्रीत असल्यासारखं दाखवतील..पून्हा नातेवाईकाला टाळलं यात फुशारकी मानणारे महाभाग ही मी बघितले आहेत... मला काय म्हणायचय, घाई हा तुमचा नाईलाज होऊ शकतो पण ती तुम्ही तुमची हुषारी कशी समजता?
पण आमचा डाँक्टर खरच हुषार असला तरी साधा आहे
तर काय झालं, डाँक्टर दवाखान्यात जायला निघाला ,रस्त्याला लागला आणि काही अंतरावर त्याचा मामा त्याला दिसला... थकलेला वयस्कर,पार्कींसंस चा त्रास असलेला,एकटाच निघाला होता वसईला राहणारा मामा इतक्या सकाळी इथे काय करतोय? आणि चारकोपला आला तर घरी कसा आला नाही? म्हणून डाँक्टर कासावीस झाला... चक्क चार पावलं धावला त्याने मामाला आडवलं
पण पाहिलं तर तो दुसराच कोणी होता... सेम टू सेम मामा सारखे दिसणारे ते ग्रुहस्थ निमूट आपल्या वाटेने चालले होते
विनूने थांबवल्यावर ते थांबले त्याना बघून डाँक्टरच्या लक्षात आलं तो जरा खजील होत म्हणाला माफ करा हं! मला वाटलं माझा मामाच चालला आहे.. म्हणून मी धावत येऊन अडवलं
ते वयस्कर ग्रुहस्थ जरा हसले... म्हणाले वा वा बरं वाटलं मामाला रस्त्यात बघून धावत येऊन थांबवणारे भाचे अजून आहेत... नाहीतर आमचं नशीब
दोन दोन मुलगे आहेत पण एकाला बापा बरोबर दवखान्यात यायला वेळ नाही
पार्कंसंन सारखा आजार सांभाळत खुरडत खुरडत आम्हीच डाँक्टरांकडे जातो... जगायला तर हवच नाहीतर हिच्याकडे कोण बघणार?
संवादच खुंटला... आणखी एका शब्दाने संभाषण वाढवणं दोघानाही अशक्य झालं त्यातला फोलपणा दोघानाही जाणवला...पण डाँक्टर त्याना जाताना बघून अस्वास्थ झाला..हा प्रसंग खूप काही सांगून जातो नाही का?
मामाला बघून त्याला भेटायला धवणारे भाचे आहेत अजून.. अगदी निराशजनक चित्र नाही
आणि त्यात आता ग्रुहं संकूल उभं करताना संकुलातच व्रुद्धाश्रम उभं करण्याची कल्पक योजना सुचली आहे... झाकली मूठ सव्वा लाखाची राहयला मदत होईल
आमच्या डाँक्टरच्या अस्वस्थतेला देवाने दिलेला कौल आहे.. कारण तसा आमचा डाँक्टर देवभोळा सुद्धा आहे...

No comments:

Post a Comment