Saturday, May 17, 2014

मातीच्या गोष्टी….

लहानपणी आई एक गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगायची,आणि आम्हीही ती माहीत असलेली गोष्ट पून्हा पून्हा तितक्याच उत्कंठेने ऐकायचो... आता मला माहीत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही असं होईल का?
तर एका गावा बाहेर एक साळीचं शेत असतं.चंडोलपक्षानं त्या पिकामधे आसरा घेत पिल्लांसाठी घरटं बांधलेलं असतं
चंडोल पक्षाचं घरटं असलं तरी त्याचा पत्ताच नसतो त्याची मादीच आपली तीन पिल्लाना सांभाळत त्या घरट्याची रखवाली ...करत असते. पिल्लाना चारा आण, किडॆ आण, टोळ मिळाला तर तो आणून भरव, कुठे काडी निसटली तर ती ठीक कर कापूस आणून भर, पिल्ल आपली बघावं तेंव्हा चोच आवासून आपल्या आईची वाट बघत असायची
ती पक्षीणी पिल्लं जरा मोठी झाल्यावर त्याना सांगते, घाबरायचं नाही कोणाची चाहूल लागली तर गप्प बसायचं कोण काय बोलतय, कसे आवाज काढतय सगळ्यावर लक्ष ठेवायचं
काही महत्वाचं वाटलं तर माझ्या कानावर घालायचं. पिल्लं आपली त्यांच्या भाषेत हो हो म्हणत माना डोलावतात. कुठेही जा माना डोलवणं सेमच असतं नाही.. आपण सुद्धा... असो! तर एकदा काय होतं?
त्या शेताचा जमीनदार शेताची पाहणी करायला शेतात फेरफटका मारायला येतो. बरोबर त्याचा लोचट मुनीमजी असतोच. तयार झालेलं शेत बघून जमिनदार म्हणतो "हं! शेत कापायला झालय, आता कापायला हवं... पिल्ल घाबरतात.. हे आईच्या कानावर घलायला हवं शेत कापलं तर आपण कुठे जायचं? आई आल्या आल्या पिल्ल कलकलाट करतात पण ते ऐकून आई आपली शांतच. पिल्ल विचारतात, आई तुला भिती नाही वाटत? आई म्हणते अजून नाही पण तुम्ही मात्र सावध रहा शब्दंशब्द ऐका आणि मला सांगा काही दिवस जातात पून्हा जमिन्दार येतो सोबत मुनीनजी असतोच
जमिनदार म्हणतो अरे आता शेत कापायला घ्यायला हवं जरा त्या शिरप्याला विचारा म्हणावं जरा कापून दे... पिल्ल हे ऐकातात तत्परतेने आईच्या कानावर घलातात तरी आई आपली शांतच
परत थोडे दिवस जातात शेत तसच डुलत असतं पिल्लं वाढत असतात पण अजून पंखात बळ येणं बाकी असतं त्या दरम्यान जमिनदार असाच फेर्‍या मारून जातो पाहणी करून जातो देवदयेनं या घरट्याकडे त्याचं लक्ष जात नाही. याला सां गा त्याला सांगा करण्यात समय जात असतो.
आणि एक दिवस जमिनदार येतो त्याच्या बरोबर त्याचा मुलगाही असतो कोणा कोणाला शेत कापायला सांगितलं याची उजळणी होते नोकर चाकर गडी माणसं,गावातली माणसं... शेवटी मुलगा म्हणतो जाऊदे अप्पा! आता उद्या अपणच येऊया आणि शेत कापायला घेऊया कशाला कोण हवय?
आई आल्या आल्या पिल्लं तिला हे सांगतात आणि जेंव्हा ती हे ऐकते की आता कोणावरही अवलंबून नं राहता जमिनदार स्वत:च शेत कापायला घेणार आहे तेंव्हा मात्र ती आई अस्वस्थ होते पिल्लाना दाखवत नाही पण जरा घाबरते
.. पिल्लं विचारतात..आई काय झालं?विचारात पडलेली ती आई म्हणते.. इतके दिवस ते दुसर्‍या कोणाची वाट बघत होते तो पर्यंत काळजी नव्हतीपण आता ते स्वत:च शेत कापणार म्हणजे.आपली इथून हलायची वेळ झाली.
पहाटेलाच पिल्लाना म्हणते जरा उडायचा प्रयत्न करा त्यानिंबावर जाऊन बसा .. आणि आईच्या इशार्‍या बरोबर ती पिल्लं घरटं सोडतात... कसाबसा जवळचा निंब गाठतात
माँरल आँफ द स्टोरी काय? स्वत:च्या कामासाठी स्वत:लाच उभं राह्वं लागतं
माझं कपाट आवरायची वेळ आलीकी राहून राहून मला ही गोष्ट आठवते.. तात्पर्य काय तर उद्या बहुतेक आपली भेट होणे नाही...

No comments:

Post a Comment