Saturday, May 17, 2014

गाभारा…



जगात देव आहे हे मी आता ठामपणे सांगू शकतो, आता या बद्दल दुमत नाही वाद घालायचं सुद्धा कारण नाही, कोणी म्हणले दर्शन झालं का?.. नाही पण साक्षातकार झाला... अत्ता मी मारुतीला गेलो होतो तसा रोजच जातो..पण आज शनिवार ना? मारुतीचा वार... नेहमी येणार्‍या भक्तांपेक्षा शनिच्या भितीने भक्तीभावाने जमा होणारे भक्त जास्त असतात... अठरापगडचे भक्त, दाही दिशातून आलेले..त्यांची भक्ती म्हणजे काय विचारता? देऊळ छोटेखानी त्यात रस्त्याला लागून, प्रवासी बसेसची सतत ये जा श्रीमंत भक्त अर्थात गाडीने येतात ड्रायव्हरने शक्यतो देवळाच्या समोर सोडावं हा त्यांचा आग्रह मालकाला सोडून गाडिवान यु टर्न घेऊन जाणार त्यासाठी थोडा अवधी लागतोच आमच्यासारखे सामान्य तिथेच आपले रांगेत उभे... जो पर्यंत रांगेत असतो तो पर्यंत ठीक पण जस जसं गाभार्‍यापाशी पोहोचतो आमची भक्ती मनात उचंबळून यायला लागते.एकच झूंबड उडते त्यात गाभार्‍या समोर तेल सांडलेलं तेल उगाच सांडत नाही त्यालाही दुर्ल्क्षीत अनेक कारणं आहेत एक म्हणजे रांग पुढे सरकत असतानाच आमच्या हातात नारळ रुईच्या पानांचा हार उदब्त्ती उडीद शेंदूर घातलेल्या तेलाची वाटी लिंबूमिरची कोळसा असं काय काय दिलं जातं त्यात लहान मुलं असतील तर दहामुलांपैकी चार मुलं तेलाची वाटी हातात धरायचा हट्ट करतात बाल हट्टच तो पण तो कधी कुठे कसा पुरवायचा याला नियम नाही,चार पैकी दोघे पालक त्यामुलांच्या हातात तेलाची छोटी वाटी देतात रांगेतले भक्त चुळभुळत असतातच त्यात प्रदक्षिणा घालणारे जोरावर आलेले असतात. त्यात ते ही एक प्रदक्षिणा घालून गप्प बसत नाहीत. अकरा एकवीस एकावन्न प्रदक्षिणा घालणारे महाभाग आहेत भेदभाव करायचा नाही पण निरिक्षणावरून सांगतो यु पी चे लोक भक्ती इतरांवर लादतात.. आता इतक्या प्रदक्षिणा पूर्ण करायच्या तर त्याना लिटरली धावावं लागतं मग कोणाला धक्का लागला कोणाच्या पायावर पाय पडला तर काय झालं? असा त्यांचा अविर्भाव असतो.. या धावपळीत हमखास तेल सांडतं.. साऊथ इंडीयन असतात त्याना प्रदक्षिणे पेक्षा नमस्कार करण्यात जास्त भाव जाणवतो मग कोणी तिथेच तीन वेळा साष्टांग नमस्कार घालतं कोणी लोटंगण घालतं आता मारवाडी लोक जे आहेत ते मुर्तीसमोरून बाजूला होताना म्हणे देवाला पाठ दाखवत नाहीत, किती विनोदी प्रकार? देवाला पाठ दाखवायची नाही म्हणून चार पावलं ते उलटे मागे येतात म्हणजे बघाहं ! आधी प्रदक्षिणा घालणारे धावत असतात त्यात तेल सांडून सांडून जमीन पच्यपचीत झालेली असते निसरडी झालेली असते. लोटांगण घालणारे पडलेलेच असतात त्यात हे उलटे चार पावलं मागे येणारे मागे येतच असतात कल्पना करा अपघात कसा होऊ शकतो पण बरेचदा होत नाही,का? कारण देव तिथे हजर असतो तेलाची वाटी मुर्तीवर रीती करताना त्यातला शेवटचा उडीदही मुर्तेच्या शिरावर पडावा म्हणून टणा टणा मुर्तीवर वाटी आपटतात तो पर्यंत ते मागे हाटत नाहीत.. मग नारळ वाढवायचा असतो नारळ नुसता अर्पण करून चालत नाही कारण मग अर्धी वाटी मिळत नाही आणि काही काहींच्या घरी म्हणे अर्धी वाटी घरी नेल्याशिवाय घरात घेत नाहीत कारण दुसर्‍या दिवशी रविवार असतो.काहीजण छोटीवाटी मोठी वाटी असं परिक्षण उभ्या उभ्या करतात पण ते करायला तिथेच उभे असतात आणि त्यात रविवारी नारळ लागतोच.
त्यात परत नुसता नारळ वाढवून चालत नाही, नारळातलं पाणी आधी चारही दिशाना उडवायचं उरलेलं मुर्तीवर शिंपडायचं त्यासाठी ते पाणी सांडून संपायच्या आत फोडलेला नारळ घेऊन धावत जाऊन गाभारा गाठायचा तिथे आँलरेडी मुर्तीसमोर कोणीतरी ओंणवा असतोचपण त्या आधी तेल सांडलेल्या जमिनीवर नारळाच्या पाण्याचाही अभिषेक होतो चिकचिक वाढते त्यात यु पीची किती माणसं वाढली आहेत त्या प्रमाणात भक्तही वाढलेत पण निव्वळ तिथे देव अवतिर्ण होऊन ट्रँफिक पोलीसचं काम करत असावा म्हणून आमच्यासारखे बचावतात त्यात आणखी एक रिवाज आहे दक्षिणेकडचे काही भावीक तिथल्यातिथे नारळावर कापूर ठेऊन देवाला ओवाळतात.. तर काही महाभाग नारळाची शेंडी मुर्तीसमोरच्या दिव्यावर धरतात शेंडी चांगली शिलगे पर्यंत तिथून हाटत नाहीत कधी कधी ती शेंडी पेट घेते मग धावत जाऊन तो नारळ वढवायचा... हे सगळे रिवाज झाले भक्ती कुठे आली? भाव कुठे आला? तरीही तो निर्विकार राहून सगळ्याना सांभाळतो याचा अर्थ तो आहे की नाही?
मला खरच सगळ्याचा उबग आलाय..खास करून कणकेचे अकरा एकवीस एकावन्न दिवे लावणारे सुद्धा महाभाग आहेत ते ही म्हणे चढत्या उतरत्या क्रमाने.. ते दिसतात छान पण अपघाताचा विचार केला तर ते घातकच आहेत... खरच हे रिवाज ह्या पद्धती कोणी आणि का पाडल्या असतील सिव्हिल सेंस आपण इथे वापरत नाही तर तिर्थस्थानाला भेट देताना आपलं काय होत असेल काहीजण देवाला त्रास दिला की तो ऐकतो म्हणत मारुतीला मीठ फासतात किती अमानुष आहे हे... त्यासाठी खडे मीठ लागतं ते जमिनीवर सांडलं तर ते पायाला टोचतं भय्येलोकांसाठी खास चमेलीचं तेल विकायला असतं त्या तेलाच्या रिकाम्या बाटल्या भावीक(?) तिथेच टाकून जातात इतक्या गडबडीत तेलाच्या वाटीत आपला चेहरा एकाग्रपणे शोधत किंवा बघत काहीजण उभे असतात त्याना सांभाळण्याची जबाबदारी देवालाच घ्यावी लागते
त्यात भिकार्‍यांचा उपद्र्व पावसाची जोरदार सर आली तर ते सुद्धा देवळाच्या आसर्‍याला येतात त्यात भटकी कुत्री आहेतच आणि हे सगळं निस्तरायला मला वाटतं तो गाभारा सोडून सगळ्यांची काळजी घ्यायला बाहेर अवतीर्ण होतो.

No comments:

Post a Comment