Wednesday, March 19, 2014

ती आणि तिचा शिवाजी ... !


ती आली कि आमच्या घरी कि नियम आहे, तिला घेऊन दुकानात जायचं
आणि मस्तपैकी drawing बुक आणि भरपूर sketch पेन्स घ्यायचे,
ती आज आली आणि आम्ही दोघे ठरल्याप्रमाणे निघालो खरेदीला...
तिचा एक नियम आहे, माझ बोट तिने
नाही धरायचं मी तीच बोट धरून चालायचं...
चौकात पोहचलो...
आज सेनेची शिवजयंती मोठ्याने स्पीकर वर
"आनंदवन भुवनी..." अस गाण चालू... रस्ता क्रॉस
करता करता तिचा प्रश्न -" काका, आज शिवाजी महाराजांचा बर्थडे
आहे का?" मी आपल "हो" म्हणून सांगितलं...
मग
तिचा पुढचा प्रश्न "मागच्या महिन्यात तर झाला त्यांचा बर्थडे,
आपणच नाही का गेल्तो, दोन दोन बर्थडे ? म्हणजे दोनदा जन्मले का?"
मी जरा मोठ्याने हसत म्हंटल " नाही ग बेटा, दोनदा कसे
जन्माला येतील, एक माणूस एकदाच जन्माला येतो,पुन्हा नाही..."
"मग दोन दोन बर्थडे कसे" तिचा प्रश्न अजून बाकी होता.
" मी शिवाजी महाराजांना पाहिलं नाही, तू पण पाहिलं नाही... आज
जे जे आहेत त्यांनी कुणीच पाहिलं नाही... खूप खूप वर्ष होऊन गेले
त्यांना, त्यांचा जन्म कधी झाला याचा खूप लोकांनी शोध
घेतला आणि मग त्यांना तारीख सापडली....ती तारीख म्हणजे
मागच्या वेळी आपण साजरी केल ते... आता काही लोकांना हे मान्य
नव्हत... त्यांनी तारीख ही आपली भानगड नाही म्हणून
तिथी नुसार चालू केली जयंती...."
"हम्म " म्हणत तिला ते कळाल नाही अस दाखवून दिल... मग
मी अजून सोप्प करून सांगाव म्हणून प्रयत्न करू लागलो "
शिवाजी महाराज मोठे माणूस होते कि नाही, प्रत्येक जण
म्हणतो ते आमचेच... म्हणजे ते
अश्या मोठ्या लोकांची चोरी करतात आणि मग त्यांच्या नावावर
खोट खोट सांगत फिरतात."
माणस चोरतात हे तिला नवीनच वाटल, ती खळाळून हसली "
माणस चोरतात? म्हणजे शिवाजी महाराजांना पण चोरलं?"
ती पुन्हा हसली... मी ही तिच्या हसण्यात सहभागी झालो...
ती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणाली "
हा पुतळा नाही आवडत मला"
" अग शिवाजी महाराजांचा आहे तो, तुला आवडत
नाही का शिवाजी महाराज?" मी विचारल.
" आवडतात ना काका, पण हे अस घोड्यावर बसून तलवार घेतलेले नाही"
" मग कसे आवडतात" आता काही तरी नवीनच ऐकायला मिळणार
म्हणून मी उत्सुक झालो.
" तो नाही का तुझ्याकडे जिजामाता आणि बालशिवाजी शेतात नांगर
ओढतानाचा फोटो आहे तो आवडतो मला"
आम्ही घरी पोहचलो होतो...
"जा आता चित्र काढा" म्हणून
तिला घरात सोडलं... 
मी पुन्हा चौकात येउन
शिवाजी महाराजांचा पुतळा न्याहाळू लागलो....
त्यांची भावमुद्र प्रचंड रागीट वाटत होती....

No comments:

Post a Comment